रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर : प्रत्येक व्यवसायिकाने पाहण्यासारखा सिनेमा ..

रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर : प्रत्येक व्यवसायिकाने पाहण्यासारखा सिनेमा ..

बुद्धी कोणाला नाही म्हणून आजवर जगात सगळीकडे एकाच ....ह्यांना  टोकले जाते ,मुळात कधी लक्षात आले आहे का ..सगळे व्यवसाय हेच सांभाळत आहे त्याच बरोबर आपल्या देशासाठी पण कार्य करीत आहेत .तर मुद्दा हा नव्हे तर ..हा सिनेमा आपल्याला (व्यवसायिकाला )काय शिकवतो .
"सेल्स " हा प्रत्येक व्यवसायिकाच एकच टार्गेट ..कसे वाढेल "सेल्स "
त्यासाठी आधी सिनेमाची रूपरेखा म्हणजे पाहिलेल्यांना आठवेल ,न पाहिलेल्यांना काही गोष्ट कळतील ..
हरप्रीत सिंग हा एक अत्यंत सामान्य बुद्धीचा पदवीधर असतो. प्रत्येक परीक्षेत याला ४०% टक्क्याच्या वर मार्क कधीच मिळालेले नसतात. आता इतक्या कमी मार्कांवर कुठे नोकरी मिळणार असा याच्या मित्रांना प्रश्न पडतो. हा जरी सामान्य बुद्धीचा  मुलगा असला तरी याचे सगळ्या मित्रांशी खूप चांगले संबध असतात. म्हणजे तो कागदी परीक्षेत जरी मागे असला तरीही, लोकसंबध कसा नीट जपावा याची याला पूर्ण कल्पना असते. शिक्षण झाल्यावर पुढे उच्च शिक्षण घेण्याचा प्रश्नच नसतो. घरात आईवडील नसल्याने आजोबांनी याला मोठे केलेले असते. आता नोकरी करणे हा एकाच पर्याय याच्या समोर असतो. पण कुठली नोकरी करणार असा प्रश्न विचारला की "सेल्स" असे याचे उत्तर असते.

(हे जग आपल्याला सेल्स शिवाय जगूच शकत नाही म्हणजे काय शिकणे गरजेचे आहे सेल्स आणि सेल्स )

तर असा हा हरप्रीत नोकरीसाठी मुलाखत द्यायला AYS नावाच्या एका कॉम्पुटर विकणाऱ्या कंपनीमध्ये जातो. मुलाखतीला बोलावण्याची वाट बघत असताना त्या कंपनीतील सेल्स मधील लोकांच्या प्रत्येक हालचाली हा टिपून घेतो. मुलाखत घेताना, सेल्स  मॅनेजर याला मुद्दामून इरेजर काढून घेतलेली पेन्सिल मला विक असे म्हणून त्याच्या समोर फेकतो. हा प्रयत्नांची पराकाष्टा करून पेन्सिल कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण सेल्स  मॅनेजर नितीनला काही पटत नाही. पण तितक्यात कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर खोलीत येतो आणि नितीन म्हणतो की इतकी छोटीशी पेन्सिल हा मर्सिडीज म्हणून विकतो आहे, तू याला तुझ्या टीम मध्ये घे. नितीनची इच्छा नसते, पण मॅनेजिंग डिरेक्टर सुनील पुरीच्या आग्रहाखातर हा याला घेतो.
(म्हणजे काही वेळा असे पण निर्णय घ्यावे लागतात कि आपल्या मनाविरुद्ध असतात ,आपण त्याचा विचार करीत नाही उलटे हताश होतो )

छोटेलाल मिश्रा हा या ऑफिस मधील प्युन असतो. याला ऑफिस मधील सगळे जण कप-प्लेट असे म्हणत असतात. मिश्राला हे आवडत नसते, पण हा कंपनीमधील सगळ्यात कमी दर्जाचा नोकर असल्याने याला बोलण्याचा काहीच अधिकार नसतो. कोयना म्हणून रिसेप्शनिस्ट असते. हिचा वापर एक अॅटम गिर्ल म्हणून केला जातो. हि ऑफिस मधील खूप कामे सांभाळत असते. गिरी म्हणून कस्टमर सपोर्टचा मॅनेजर. हा गिरी  एक वल्ली असतो, ज्याला पोर्नोग्राफी फोटो बघण्यात खूप रस असतो. हा ऑफिस मध्ये बसल्या बसल्या हेच काम करत असतो. पण हा त्याच्या कामात खूप हुशार असतो. ऑफिस मधील सगळे सेल्समन एकमेकांशी खुनशीने वागत असतात. प्रत्येकाची एकमेकांशी स्पर्धा असते, आणि एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो. थोडक्यात काय तर ऑफिसमधील वातावरण चांगले नसते.
(हल्ली हे सगळीकडेच दिसते त्यामुळे एकमेकांना न पाडता व्यवसाय किंवा नोकरी करणे गरजेचे आहे पण हे होत नाही )

साध्याभोळ्या हरप्रीतला हे सगळे बघून खूप विचित्र वाटते. पहिल्याच दिवशी याला वर्षभराचे टारगेट दिल्या जाते. प्रत्येक सेल्समनला शहरातील एक भाग वाटून दिलेला असतो. तो सेल्समन त्याच भागात सेल करू शकेल, तर हरप्रीतच्या वाटेला एक रेसिडंट एरिया येतो. हरप्रीत, नितीनला म्हणतो कि इथे तर कोणीच कॉम्पुटर घेणार नाही, त्यावर नितीन त्याला म्हणतो कि तू नवीन आहेस तुला हाच भाग सांभाळला पाहिजे. जेव्हा हरप्रीत फिल्ड वर जायला निघतो तेव्हा नितीन त्याची काम हरप्रीतला करायला सांगतो. तो असाच एका कंपनीत जातो, आणि तिथे त्याला लाच किती देणार असे विचारले जाते. हे बघून हा खूप गडबडून जातो व परत येताना कंपनीच्या तक्रार केंद्रात या अधिकाऱ्याबद्दल तक्रार नोंदवतो. याच्या तक्रारीमुळे कंपनीची मोठी ओर्डेर कॅन्सल होते.

सगळे लोक याला नाव ठेवू लागतात. व याला काही बुद्धी नाही हा एकदम झिरो आहे असे सुनील पुरी म्हणतो. हरप्रीतला बाहेर जाण्यास मनाई केल्या जाते, आणि ऑफिस मध्ये बसूनच याने कस्टमरला फोन करायचे असे ठरवल्या जाते. हा फोन करायला लागला कि ऑफिस मधील सगळे उरलेले सेल्समन याला कागदाची विमाने करून फेकतात. एकुणात याला इथे खूप अपमानित वागणूक मिळते. पण हरप्रीत सगळे सहन करतो. कोयना जरी फटाकडी असली तरी, तिला हरप्रीत बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. ती त्याला चोरून २ कॉम्पुटर विकत घ्यायला उत्सुक असलेल्या ग्राहकांचे पत्ते देते. सुरवातीला हरप्रीत म्हणतो कि मला हे नको, पण शेवटी ते पत्ते ठेवतो.
दुसऱ्या दिवशी या ग्राहकांना चोरून म्हणजे कंपनीच्या लोकांना न सांगता भेटतो. तिथे त्या २ मुलींना नक्की कुठला कॉम्पुटर हवा आहे याची चौकशी करून तो कॉम्पुटर बाजारात कुठे असेम्बल करून मिळेल याची सगळी माहिती काढतो. कंपनी किती नफा घेते याचा हिशोब याच्या लगेच लक्षात येतो. आणि तेव्हाच तो ठरवतो, कि हे कॉम्पुटर आपण स्वत: विकायचा. त्याप्रमाणे तो सकाळी ऑफिस मधून या मुलींना कॉम्पुटरच्या डीलचा फोन करत असतानाच याच्या अंगावर एक रॉकेट येते. आणि त्याच आवेशात तो सांगतो कि तुम्ही "रॉकेट सेल्स कार्पोरेशन" या नावाने चेक द्या. तिथेच हरप्रीतच्या रॉकेट सेल्स कार्पोरेशनचा जन्म होतो. नंतर  हरप्रीत कंपनी कशी पुढे नेतो व रॉकेट सेल्स काय काय कमाल करते, हे बघा "रॉकेट सिंग- सेल्समन ऑफ दि इअर" या सिनेमामध्ये.
सिनेमा टिपिकल हिंदी सिनेमा नाहीये. त्यामुळेच का काय, हा बॉक्स ऑफिस वर आपटला. हा सिनेमा बघून झाल्यावर एकदम ताज तवाने वाटावे इतका छान सिनेमा आहे. कुठेही वास्तवाची अवास्तव साथ सोडली नाहीये. सिनेमातील सगळी पात्र खूपच सुंदर रंगविली आहेत. सिनेमात एकाच हिरो आणि बाकी त्याला सपोर्टिंग असे नाहीये. सगळ्यांच्याच भूमिका तितक्याच महत्वाच्या आहेत. खूप काही शिकवून जातो.. रिस्क तो स्पायडरमॅन को भी उठाना पडता है.. मै तो फ़िर भी सेल्समन हू..!! सारखे डायलॉगस तर जबरदस्तच. शेवटचा 1 रुपया वापस करतानाचा सिन तर केवळ अप्रतिम.
मुळात हा सिनेमा आपल्याला काय शिकवतो


एकमेकांच्या मदतीने खूप काही साध्य करू शकतो .
जगात नाही हा शब्दच मुळात नाहीसा व्हायला हवा
कोणाला कमी लेखून आपला मोठेपणा करणे चुकीचे आहे .
जर टार्गेट फिक्स असेल तर आलेली वादळ पण दूर करू शकतो.
मनात काय करायचे हे फिक्स करा बस मार्ग मिळत जातात .
असे अनेक गोष्ट आपण सिनेमात पहातो पण शिकत नाही ,जर एक व्यवसायिक म्हणून उभे रहायचे असेल तर नक्कीच हा सिनेमा स्वतः जगा पहा यश नाही पण आनंद नक्कीच मिळेल


Comments

Popular posts from this blog

जीवन एक आध्यात्मिक बाग

मी पैसा बोलतोय